गोदावरी वाढदिवसानिमित्त २७ ला गोदावरी डे

गोदावरी हा नाशिकचा प्राण आहे. गोदावरीने लाखो वर्षांपासून नाशिकरांना जगण्याची ऊर्मी देत आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोदावरीकडे आपण फक्त पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत म्हणून आणि धार्मिक अंगाने तिच्याकडे पाहत आलो आहोत. त्यामुळे तिचा काळजी घेतली गेली नाही अन् सांडपाणी वाहून नेणारी गटारगंगा म्हणूनच तिचा वापर होऊ लागला. तिचे हे स्वरूप बदलण्यासाठी प्रत्येकजण झटतो आहे. मात्र नाशिककर जोपर्यंत संघटीत होऊन या विषयावर आवाज उठवत नाहीत. प्रत्येक नाशिककराला जोपर्यंत ही आपली आर्इ आहे जननी आहे असं वाटत नाही तोपर्यंत जनजागृतीची गरज आहे. गोदावरी नदीची स्वच्छता अन् तिच्यावर अतिक्रमण होणार नाही, यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी. २७ जानेवारीला गोदावरीचा वाढदिवस असतो.  यानिमित्त वारसा व रिकनेक्टींग विथ गोदावरी या जनचळवळीच्या माध्यमातून गोदावरी सप्ताह (गोदावरी विक) साजरा केला जात आहे. कोपरगावच्या लेखिका व गोदा अभ्यासक मधुमालती जोशी या संत दासगणु लिखित गोदा माहात्म्य महिनाभर दररोज रिकनेक्टींग विथ गोदावरी या पोर्टलवर लेखांच्या माध्यमातून उलगडून सांगत आहेत. तसेच ‘वारसा’तर्फे शिल्पा डहाके या गोदावरीचे वेगवेगळे अंग याच पोर्टलवर उलगडणारे लेख लिहित आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून गोदा परिक्रमेलाही नाशिककरांना आमंत्रित केले जात आहे. आतापर्यंत झालेल्या तीन गोदा परिक्रमेला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गोदावरीबाबत जनजागृती करण्याबाबत पुढचे पाऊल म्हणून गोदावरीच्या वाढदिवसानिमित्त २७ जानेवारीला जर्लापण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जर्लापण सोहळा म्हणजे आतापर्यंत आपण गोदावरीकडून खूप काही घेत आलो आहोत. यंदा तिच्या वाढदिवसानिमित्त तिला काही तरी नाशिककरांनी द्याव, असं अपेक्षित आहे. आपण सर्व मिळून गोदावरीची काळजी घेणार आहोत असे वचन गोदावरीला जल अर्पण करून देणार आहोत. २७ जानेवारी, शनिवारी सकाळी ९ वाजता दुतोंड्या मारूतीजवळ सर्वांनी एकत्रित जमायचे असून, प्रत्येकाने येताना सोबत पाणी आणायचे आहे. आपण आणलेले जल तिला अर्पण करून गोदावरी नदीची सुरक्षा हे नाशिककरांचे प्रथम कर्तव्य ही शपथ यावेळी आपण घ्यायची आहे.

शाळा, कॉलेजसमध्येही व्हावा उपक्रम

गोदावरी डे हा उपक्रम शाळाशाळांमध्ये तसेच कॉलेजसमध्ये होण्याची गरज आहे. ज्यांना २७ जानेवारीला गोदावरीवर येणे शक्य नसेल त्यांनी शाळा-कॉलेजेसमध्ये गोदावरी डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे. या कार्यक्रमांमागे नदीचे महत्त्व, तिच्या संरक्षणाची गरज, आपल्या सवयी, प्लॅस्टीकचा वापर बंद करणे व गोदावरीच सांडपाणी व कचरा न टाकण्यासारख्या गोष्टींवर मुलांना माहिती करून द्यायला हवे. गोदावरी डे निमित्त निंबध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करून गोदावरीचे सध्याच्या रूपावर जनजागृती करायला हवी.

सहभागी होण्यासाठी संपर्क

गोदावरी जन्मोत्सवानिमित्त २७ ला गोदावरी डे गोदाघाटावरील दुतोंड्या मारूती येथे साजरा होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सकाळी ९ वाजता एकत्रित जमायचे आहे. अधिक माहितीसाठी निलेश गावडे यांच्याशी ९६७३९९४९८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

News Reporter
I am an architect turned anthropologist. After finishing my Masters in Anthropology from University of Pune, I was working with Gokhale Institute of Politics and Economics, Pune under a project funded by UNICEF and Integrated Child Development Scheme, Government of Maharashtra. During which I was stationed in Nandurbar District of Maharashtra (which is predominantly a tribal region) as a Field Research officer. Currently, I am a doctoral candidate in Department of Humanities and Social Sciences, Indian Institute of Science Education and Research Mohali, India. My current research explores the interaction of the cultural-religious, the political-economic and the ecological dimensions of the river in Nashik city in Maharashtra. Broadly, investigating how the multiple perspectives of a natural resource overlap, contradict, challenge and support each other, thus shaping the urban landscape and producing socio-spatial inequalities.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *