Exploring ways of engaging with the river, for the river

Societies engage with rivers at myriad scales through multiple activities. However, the river-society interactions are becoming a one-way process where, the societies are over-exploiting the rivers as a resource. To make the river-society linkages more dialectic, on the occasion of International Rivers Action Day on 14th March and World Water Day on 22nd March, we at Reconnecting with Godavari and Vaarsa.com are celebrating a River Action week in Nashik. The motive of this celebration is to explore several ways of engaging with the rivers to understand the complexities of a river and its needs.

The activities of this week are dispersed along various locations along the Godavari and its tributaries in the city. There are several groups working for different issues of the rivers in Nashik. In collaboration with these groups, the ‘Reconnecting with Godavari’ has formulated following activities:

14th March 2018: Exploring the etymology and meaning of the word ‘Godavari’ with language expert Amol Padhye (Karvi Library, Nashik Road; 4:oo pm)

16th March 2018: Godavarishi Gappa Tappa at Kopargaon organized by writer Madhumalti Joshi (Kopargaon, 9:00 am)

17th March 2018: Nandinishi Gappa Tappa with ecology expert Jui Pethe and the group of Goda Samvardhan Mohim (Mhasoba Temple, Untwadi; 4:00 pm)

20th March 2018: Exploring Godavari through Calligraphy, Calligraphy demonstration by artists Pooja Nilesh, Nilesh Gaidhani and Chintaman Pagare (Yashwantrao Pantangan, 4:00 pm onwards)

20th – 22nd March 2018: Photo Exhibition on the themes of ‘River and Women’ and ‘River and Development’ (Yashwantrao Patangan, 4:00 pm  onwards)

24th March 2018: Interaction with Aslam Saiyad of Mumbai River Photo Project and members of River March for India, Mumbai (Pustak Peth)

For more information and participation please contact Nilesh Gawde (9673994983), Amol Padhye (9822110916), Shilpa Dahake (7087190738)


पाणी, नदी व गोदावरीवर आठवडाभर कार्यक्रम | चला, गोदावरीशी नाते जोडूया!

कृतिशील नदी दिन व जागतिक पाणी दिनानिमत्त वारसातर्फे आठवडा कार्यक्रम

नाशिक : प्राचीन काळापासून मानव वस्ती नदीलगत वसली आहे. याला पाणी हेच मुख्य कारण आहे. मुबलक पाणी नदी देत असल्याने मानववस्तीचा विकास होत गेला. मात्र या विकासाबरोबर नदीच्या प्रदूषणही वाढत गेले. नदीशिवाय मानवी अस्थित्व शक्यच नसल्याने नद्या जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. हे ओळखूनच वारसा व गोदावरीशी नाते जोडूया या संस्थांतर्फे १४ मार्च कृतिशील नदी दिन व २२ मार्च जागतिक पाणी दिनानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यता येणार आहे.

वारसा व गोदावरीशी नाते जोडूया या संस्थांतर्फे १४ मार्चला नाशिकरोड येथील कारवी ग्रंथालयात सायंकाळी ४ वाजता भाषा तज्ज्ञ अमोल पाध्ये यांच्याशी गोदावरी या शब्दाची उत्पत्ती व नदी या अनुषंकाने नाशिककरांची भूमिका या विषयावर गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. शिल्पा डहाके व निलेश गावडे त्यांच्याशी नदी या विषयावर चर्चा करतील.

१६ मार्च रोजी कोपरगाव येथे सकाळी ९ वाजता गोदावरीशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लेखिका मधुमालती जोशी करणार असून, या कार्यक्रमात कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, स्वच्छता दूत सुशांत घोडके, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष छोटुभार्इ जोबनपुत्रा उपस्थित राहणार आहे. या गप्पाटप्पांमध्ये कोपरगावमध्येही गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रयत्न होणार आहेत.

१७ मार्च रोजी उंटवाडी येथील सीटी सेंटर मॉलजवळील म्हसोबा मंदिरात दुपारी ४ वाजता पर्यावरण अभ्यासक जुर्इ पेठे यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नंदिनी नदीच्या स्वच्छतेबद्दल काम करणारे अमित कुलकर्णी यांच्याशी चर्चा होणार आहे.

२० मार्च रोजी अबीर क्रिएशनतर्फे गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगणात दुपारी ४ वाजता कॅलिग्राफितून गोदावरी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कॅलिग्राफी कलाकार पुजा निलेश, निलेश गायधनी व चिंतामण पगारे कॅलिग्राॅफीतून गोदावरी मांडणार आहेत.

२२ मार्च रोजी गोदाघाटावर गोदावरी या विषयावर फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनात प्रसिद्ध फोटोग्राफर निलेश गावडे गोदावरी व फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच नदी दिनानिमत्त आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच या प्रदर्शनात मुंबर्इ रिव्हर फोटो प्रोजेक्ट आणि मुंबर्इ येथील रिव्हर मार्च फॉर इंडिया या संस्थाही आपला सहभाग नोंदविणार आहेत. त्यामुळे नाशिकसह मुंबर्इच्या नद्यांची स्थिती अनुभवता येणार आहे.

२४ मार्च रोजी कॉलेजरोड येथील पुस्तक पेठ येथे मुंबर्इ रिव्हर फोटो प्रोजेक्ट आणि रिव्हर मार्च फॉर इंडियाचे सदस्य असल्म सय्यद यांच्याशी नदी या विषयावर गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे.

कृतिशील नदी दिन व जागतिक पाणी दिनानिमत्त वारसातर्फे आठवडा विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी निलेश गावडे (9673994983), अमोल पाध्ये (9822110916), शिल्पा डहाके (7087190738) यांच्याशी संपर्क साधावा.

गोदावरी नदीबाबत जनजागृती तसेच गोदावरीचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत. यात नाशिककरांचा सहभागी आवश्यक असून, या उपक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन वारसातर्फे करीत आहोत.

News Reporter
I am an architect turned anthropologist. After finishing my Masters in Anthropology from University of Pune, I was working with Gokhale Institute of Politics and Economics, Pune under a project funded by UNICEF and Integrated Child Development Scheme, Government of Maharashtra. During which I was stationed in Nandurbar District of Maharashtra (which is predominantly a tribal region) as a Field Research officer. Currently, I am a doctoral candidate in Department of Humanities and Social Sciences, Indian Institute of Science Education and Research Mohali, India. My current research explores the interaction of the cultural-religious, the political-economic and the ecological dimensions of the river in Nashik city in Maharashtra. Broadly, investigating how the multiple perspectives of a natural resource overlap, contradict, challenge and support each other, thus shaping the urban landscape and producing socio-spatial inequalities.

1 thought on “Exploring ways of engaging with the river, for the river

  1. कन्नमवार पुल ते सिंहस्थ नगर पुल हा घाट मोठा आहे. सिंहस्थ पुलावरून खाली उतरण्यासाठी जिना केल्यास जॉगर्स साठी एक जागा होइल. घाटावर स्वच्छता ठेवुन तपोवन भागात सुध्दा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. तपोवन घाटावरील जागेत भरपुर व्यायामप्रेमी मंडळी येत असतात. या ठिकाणी रात्री काही मंडळी दारु पिऊन कचरा टाकून जातात त्यावर बंदी घालावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.