संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…!

On

आज आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्याच्या अंतिम टप्प्यात भेटतोय…. काल ठरल्याप्रमाणे आज आपण गोदामाईसोबत पूर्वसागरावर (बंगालचा उपसागर) गंगासागरसंगमतीर्थी चाललो आहोत. ब्राह्मी गौतमी गोदावरी। सामावणार सागरी। ऐकता भूवरी। आनंद झाला सर्वत्र।। आणि आता या मंगलप्रसंगी कोणकोण आलेत ते पाहू… गौतम वसिष्ठ गालव। जाबाली…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय पंचवीसावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या पंचवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आज राजा ययातिची कथा येते.   नारदा राजा नामे ययाति। दोन भार्या त्याप्रति। देवयानी शर्मिष्ठा सती। त्यात शुक्रकन्या देवयानी।। देवयानीचे ठायी जाण। राजासी पुत्र दोन। यदु तुर्वसु म्हणून। पुरु अनु द्रह्यु शर्मिष्ठेचे।। एकदा देवयानीने। आणिले पित्यापाशी गाऱ्हाणे। की…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय चोवीसावा) – एक विवेचन…!

On

 संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या चोवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजच्या कथेची सुरुवात करताना, असे वाटते की आजच्या काळात या पौराणिक इतिहासाची पुनरावृत्तीच घडत आहे. त्यामुळे आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारी ही ‘वेन’ राजाची कथा.. नारदा एक सम्राट वेन। राज्य करित होता जाण। खगोल भूगोल शोधून। नाना युक्ती चालविल्या।। वेन जितुका बुध्दिमान।…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तेवीसावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या तेवीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजची कथा लक्ष्मी आणि दरिद्रा यांच्या वादविवादाने होते. लक्ष्मी म्हणते, माझ्या परी श्रेष्ठत्व। नाही दरिद्रे तुजप्रत। तु फकीर भिकार गोसाव्याप्रत। सेवुनी सर्वदा तुष्ट राही।। तू सेविसी ज्या ते गोसावीही। माझी आस करिती पाही। एकही जगी तयार नाही। तुला सदने ठेवावया।।…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय बावीसावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या बावीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आज महर्षी वसिष्ठांनी गोदातटी सुरू केलेल्या यज्ञाने कथारंभ होत आहे. तर महर्षींनी सुरू केलेल्या यज्ञात राक्षस विघ्न आणतात. व्यथित झालेले ऋषीगण देवांचे सहाय्य मागतात. देव यज्ञरक्षणासाठी ‘अजैका’नावाच्या प्रमदेला पाठवतात जी राक्षसांचे चित्त…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय एकविसावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या एकविसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… अध्यायाची सुरुवात गोदा-सिंदफना संगमाने होते. एक ‘नमुची’ नावाचा दैत्य होता. तो अत्यंत उन्मत्त झाला होता. कारण त्याला असा वर होता की, कुठल्याही ओल्या किंवा सुक्या वस्तुपासून त्याला मृत्यू येणार नाही. त्यामुळे तो…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय विसावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या विसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजच्या अध्यायाची सुरवात पुत्रतीर्थाने होते. महर्षी कश्यपांच्या दोन पत्नी, दिती आणि अदिती! एकदा दितीने अदितीला विचारले की ‘माझी मुले का वाचत नाहीत?’ तेव्हा अदिती म्हणाली की, हा प्रश्न तिने कश्यपांना विचारावा आणि दितीने तसे विचारल्यावर कश्यपांनी तिला काही नियम घालून दिले. उत्तरेस डोके करुन। कदा न करावे शयन। उखळामुसळा ओलांडून। जाऊ नये केव्हाही।। अस्तमानाचे समयी। निद्रावश होऊ नाही। सूर्य उदयास येई जयी। तेव्हा निजणे बरे नव्हे ।। हे सर्व ऐकून दितीने त्याप्रमाणे अनुसरण केले…कालांतराने ती गर्भवती राहीली. ही बातमी मयासुराकडून इंद्राला कळली इंद्राने संधी साधून तिच्या गर्भाचे सात तुकडे केले. ते सातही जण त्याच्याशी भांडू लागले. तेव्हा इंद्राने त्या सातांचे सात भाग केले आणि असे ते एकोणपन्नास झाले. पुढे हेच मरुद्गण झाले. पण दितीला या सर्वाचा खुप त्रास झाला. तिने इंद्राला शाप दिला. त्यावेळी ती अगस्ति आश्रमात होती म्हणून अगस्ति ऋषींनीही इंद्राला शाप दिला आणि जेव्हा ही गोष्ट कश्यपांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनीही इंद्राला खुप सुनावले. आता यातील रुपक उलगडून पाहूया. मरुद्गण हे देवांचे सैनिक आहेत आणि इंद्र हा देवांचा राजा. शिवाय कथेनुसार इंद्राची व मरुद्गणांची मैत्री पण दाखवली आहे. म्हणजेच इंद्राने दितीच्या एकाच मुलावर सात जबाबदाऱ्या टाकल्या आणि पुढे त्याने एकेका जबाबदारीसाठी आणखी सात-सात जणांची नेमणूक केली. असा तो बौध्दिक दृष्ट्या एकोणपन्नास…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय एकोनिसावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या एकोनिसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात… आजच्या अध्यायाची सुरुवात महर्षी अगस्तिंच्या यज्ञाने होते. देवांच्या प्रेरणेने अगस्तिऋषी दक्षिणेकडे प्रयाण करतात. वाटेत विंध्याचल पर्वत लागतो. पर्वतीय लोक मुनिवरांचे आदरातिथ्य करतात आणि त्यांना दुर्गम अशा विंध्याचलातून दक्षिणेकडे जाण्यासाठी वाटाड्याचे काम करतात आणि महर्षी गौतमीतटी पोहोचतात. गोदेकाठच्या प्रसन्न…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय अठरावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या अठराव्या अध्यायाला नमस्कार करुयात… अठराव्या अध्यायात ब्रह्मतीर्थाची कथा येते. एकदा देवदानवांमध्ये प्रचंड कलह माजला त्यात ब्रह्मदेव देवांच्या बाजूने बोलण्याऐवजी त्यांचीच (देवांची)निर्भत्सना करु लागले. विष्णुंनी ब्रह्मांना गप्प करण्याचे खुप प्रयत्न केले पण व्यर्थ! तेव्हा सर्व देवांनी गौतमीतटी धाव घेतली जेथे महादेवांचे वास्तव्य होते. देवांचे…

संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय सतरावा) – एक विवेचन…!

On

संत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या सतरावा अध्यायाला नमस्कार करुयात… आपण आता प्रतिष्ठान नगरीत म्हणजेच पैठण गावी चाललो आहोत. पैठणात आजही नागघाट, नागतीर्थ ही ठिकाणे आहेत. येथे कथा येते शूरसेन राजाची! ज्याला सर्परुपी पुत्र झाला, असे पुराण सांगते. आता सर्परुपी म्हणजे राणी नागकुळातील असली पाहिजे किंवा राजपुत्र सापाच्या स्वभावाचा…