पवित्र गोदावरी नदीचे वास्तव रूप – संजय बिरार

गोदा परिक्रमा सुरू असताना रमेश पडवळ सर गोदावरीची माहिती ही आम्हाला सांगत होते गोदा तीरी काझी गढी व इतर गढ या कश्या निर्माण झाल्या याचे अभ्यास पूर्ण विश्लेषण सरानी सांगितले हजारो वर्षांपासून वाहानारी गोदावरीत वाहून येणारा गाळ/माती ही किनाऱ्याला लागून ह्या गढ या तयार झाल्या आहे.
जवळपास दोन शे फूट उंच ह्या गढ या आहे म्हणजे पूर्वी गोदावरी चे पात्र किती भव्य होते याचा अंदाज बांधत गोदमाईची भव्यता अनुभवत पूढे पुढे चालू लागलो साधारण रामकुंडा पासून तीन किलो मीटर वर आम्ही पोहोचलो आणि गोदावरीचे वेगळे असे रूप डोळ्या समोर येऊ लागले
नशेखोर लोकांचा विळखा च ह्या भागाला पडलेला दिसतो अगदी सकाळी गोदा पात्रात दारू पिणारे महा भाग आम्हाला दिसले दारू पिणारे,व्हॅइटनर ची नशा करणारे,गांजा पिणारे व इतर नशेखोर लोकांचीच ह्या भागात चहल पहेल बघाव्यास मिळाली चर्चा चालूच होती निलेश जी गावडे यांनी असाही एक प्रश्न विचारला की हे लोक दिवस रात्र इथेच असतात प्रशासनाने ह्याच लोकांचे प्रबोधन करून त्याना योग्य मार्गदर्शन करून गोदा चे हे पात्र स्वच्छ केले तर ?? आम्ही त्यांच्या ह्या मताशी सहमत झालो.
गोदावरी चे प्रदूषित असे रूप आता डोळ्या समोर येऊ लागले ड्रेनेज चे छोटे पाइप गोदावरी चया पात्रात च सोडलेले दिसले तसेच ड्रेनेज चे मुख्य पाइप फुटलेले दिसतात त्यातून ते घाण पाणी गोदावरी च्या मुख्य पात्रात वाहताना दिसते हे दृश्य बघून कसे तरी च वाटले कारण हेच पाणी पुढे नांदूरमदमेश्वर, लासलगाव,वैजापूर,शिर्डी,कोपरगाव,पुणतांबा,औरंगाबाद,जालना,परभणी,नांदेड,व अजून काही गावे पिण्यासाठी ह्याच पाण्याचा वापर करतात काही शहरे सोडली तर बर्याश्या गावात फिल्टर ची सोय देखील नाही.
त्याच मुळे असे वाटते की हा प्रश्न फक्त नाशिक करांचा नाही तर ह्या गावांचा ही आहे म्हणूनच गोदावरी वाचवण्या ची जबाबदारी ही आपली पण आहे.

(Sanjay Birar is a River Enthusiast from Lasalgaon, he has extensively researched and written on the Shiv Nadi of Lasalgaon)

News Reporter
I am an architect turned anthropologist. After finishing my Masters in Anthropology from University of Pune, I was working with Gokhale Institute of Politics and Economics, Pune under a project funded by UNICEF and Integrated Child Development Scheme, Government of Maharashtra. During which I was stationed in Nandurbar District of Maharashtra (which is predominantly a tribal region) as a Field Research officer. Currently, I am a doctoral candidate in Department of Humanities and Social Sciences, Indian Institute of Science Education and Research Mohali, India. My current research explores the interaction of the cultural-religious, the political-economic and the ecological dimensions of the river in Nashik city in Maharashtra. Broadly, investigating how the multiple perspectives of a natural resource overlap, contradict, challenge and support each other, thus shaping the urban landscape and producing socio-spatial inequalities.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.