गोदा परिक्रमा 2

आत्मभान जागविणारी गोदा परिक्रमा १० डिसेंबरपासून

नाशिकची गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून सुपरिचित आहे. आपल्या शहराला तिची साथ अवघी दहा किलोमीटरची लाभते. मात्र या दहा किलोमीटरमध्ये आपली गोदा कशी आहे, हे पहाणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. ज्या नदीवर आपलं जीवन अवलंबून आहे. तिला आपण नेहमी नेहमी भेटायला हवं. तिच्याशी संवाद साधायला हवा. तिला समजून घेण्यासाठी १० डिसेंबरपासून गोदा परिक्रमा हा उपक्रम सुरू होत आहे. गोदा परिक्रमा दरमहिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ७ वाजता रामकुंडाशेजारील अहिल्यादेवी महादेव मंदिरापासून सुरू होईल. ही परिक्रमा नदीच्या काठाकाठानं तपोवनापर्यंत पोहचेल. तपोवनातील गोदा_कपीला संगमावरील पूल ओलांडून पुन्हा नदीचा काठाने देवमामलेदार यशवंतमहाराजांच्या मंदिरापासून व्हिक्टोरिया पुला खालून रामवाडीच्या पुलावरून पुन्हा गोदा ओलांडेल व गोदापार्कमधून पुन्हा रामकुंडावराशेजारील अहिल्यादेवी मंदिराजवळ पोहचेल. हा प्रवास साधारण तीन तासांचा आहे. यातून आपली नदी कशी आहे. तिला कशाची गरज आहे. त्यासाठी आपण काय करतो आहोत, नदीकाठचा वारसा कसा आहे, नाशिकचा इतिहास अन् गोदावरीचे महत्त्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी परिक्रमेदरम्यान गप्पाटप्पा रंगणार आहेतच. आत्मभान जागविणारा हा एक शोध आहे गोदावरीनदीचा. तर येताय ना गोदा परिक्रमेला. अधिक माहितीसाठी शिल्पा डहाके (गोदावरी नदी अभ्यासक) यांच्याशी ७०८७१९०७३८ अथवा निलेश गावडे (शिक्षणायन फौंडेशन) यांच्याशी ९६७३९९४९८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे आमंत्रण नाही.. एका परिक्रमेची सुरूवात आहे.

(सूचना : परिक्रमेत आपल्या जबाबदारीवर सहभागी व्हायचे आहे. सोबत येताना पाण्याची बाटली, टोपी व बिस्किटचा पुडा बरोबर ठेवायचा आहे. आजारी व्यक्तिंनी परिक्रमेत सहभागी होऊ नये.)

News Reporter
I am a Software engineer turned research photographer. Worked for almost 12 years in a software industry, experience in designing and developing large scale open source applications for various Fortune 500 companies in India and abroad. Left IT career to pursue passion of Photography. Currently based in Nashik as a Professional Industrial, Architectural, Heritage and Research Photographer. Runs a small NGO Shikshanaayan Foundation Nashik registered under Societies and Trust Acts, working in the field of Education, Youth Empowerment, Heritage Documentation and Nature Conservation.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.